जैतापूर एज्युकेशन सोसायटी

कार्याध्यक्षांचे मनोगत

जैतापूरसारख्या ग्रामीण भागात शिक्षणक्षेत्रा सारखे पवित्र कार्य करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ मी संस्थेचा पदाधिकारी म्हणून काम करीत आहे.

या शाळेमुळेच मी माझे पदविपर्यंतचे शिक्षण पूरे केले. खरे सांगायचे तर जीवनाची जडण–घडण व सुसंस्कृतपणा शाळेच्या तात्कालीन शिक्षकांनी व आई-वडीलांनी माझ्यात केला.

सध्या संस्था व शाळा बिकट परिस्थितीतून जात आहे. शासनाचे वारंवार बदलणारे शैक्षणिक धोरण, कित्येक वर्ष न मिळणारे वेतनेत्तर अनुदान इ.मुळे शाळा चालविणे कठीण होऊन बसले आहे. केवळ गरजू व गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्ह्णून शाळा अविरत कार्यरत राहणे गरजेचे आहे.

शाळेला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना संकल्पित आहेत. आपण सर्वानी सहकार्य केले तर नक्कीच शाळेलाही चांगले दिवस येतील.

स्नेहांकित

दिलीप गोविंद मांजरेकर
कार्याध्यक्ष

कार्यवाहांच्या लेखणीतून......

इवलेसे रोप लावियेले दारी ।

तयाचा वेलू गेला गगनावरी ॥

या संत ज्ञानेश्वरांच्या ओवी प्रमाणे दि.१३ फेब्रुवारी १९१९ रोजी लाविलेले ज्ञानरुपी रोपटयाचे आता महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. जैतापूर पंचक्रोशीतील अनेक दुर्बल व मागास विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे बाळकडू याच न्यू इंग्लिश स्कूलने पाजल्याने त्यांना आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारता आली. आज कित्येक प्रतिथयश डॉक्टर, वकील,अभियंते व उद्योगपती अभिमानाने केवळ न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्कारामुळे आम्ही घडलो असल्याचे अभिमानाने सांगतात.

मित्रांनो, सुवर्ण महोत्सव,हिरक महोत्सव व अमृत महोत्सवा पाठोपाठ शाळा आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. १३ फेब्रुवारी २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० हे वर्ष शाळेच्या इतिहासात आपल्या सर्वाच्या साक्षीने सुवर्णअक्षराने नोंदले जाणार आहे. सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षणाप्रेमींना या महासोह्ळ्यात सामिल होण्याचे व संस्थेची संकल्पित उध्दिष्टे साकार होण्यास आपल्यापरीने खारीचा वाटा उचलण्याचे मी आपणास जाहीर आवाहन करीत आहे.

स्नेहांकित

श्री. जगदीश स. आडविरकर
संयुक्त कार्यवाह व सीईओ

शताब्दी महोत्सव


जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित न्यू इंग्लिश स्कूल,जैतापूर शाळेची शताब्दी महोत्सवाकडे.शताब्दी महोत्सवी वर्ष २०१९ ते २०२०


  • श्री गणपती

    शाळेच्या आवारामध्ये डेरेदार वटवृक्षाखाली विसावलेली सतत शाळेवर कृपादृष्टी ठेवणारी हीच ती श्री गणेशाची पाषाण मूर्ती.

  • श्री सरस्वती

    विद्या व कलेची देवता म्हणजेच श्री सरस्वती. खास जयपूरहून मागविण्यात आलेली ही सुबक संगमरवरी शिल्पकृती शाळेच्या सभागृहाची शोभा वाढवित आहे.

  • श्री देव वेताळ

    समस्त जैतापूरवासीयांचे श्रद्धास्थान म्हणजेच ग्रामदैवत श्री देव वेताळ. सुमारे ८०० वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराचा नुकताच ११ मे २०१४ रोजी जीर्णोद्धार व कलशारोह्ण समारंभ कोल्हापूरचे शंकराचार्य यांच्या ह्स्ते पार पडला.

  • Follows us on