जैतापूर एज्युकेशन सोसायटी

जैतापूर एज्युकेशन सोसायटी मध्ये आपले स्वागत आहे

जैतापूर एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचालित न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर शाळेची स्थापना १३ फेब्रुवारी १९१९ साली झाली. सुरवातीला दांडेकर यांच्या वाडयामध्ये शाळेचे वर्ग भरत असत. त्यानंतर आता दिसणारी शाळेची इमारत तत्कालीन समाज धुरीनांच्या अथक परिश्रमाने साकार झाली. शाळेला स्वताच्या मालकीची जागा देण्यापासून ते इमारत बांधण्यापर्यत सक्रीय योगदान देण्याचे मोलाचे कार्य संस्थेचे माजी कार्यवाह कै.जनार्दन मुरारी सुभेदार ऊर्फ अण्णा यांनी केले.

इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत असलेली माध्यामिक शाळा पुढे १९९० साली कनिष्ठ महाविद्यालय पर्यंत वाढत गेली. कला व वाणिज्य शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर असे नामकरण झाले.

सध्या शाळेत १० शिक्षक विद्यार्जन करीत असून इतर ३ कर्मचारी त्यांना सहाय्य करीत आहेत. शाळेत सुमारे ३५० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.

संस्थापक


तेथे कर अमुचे जुळती


न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर शाळा शताब्दीकडे झेप घेत असताना आज तीव्रतेने आठवण येत आहे ती स्व. जनार्दन मुरारी सुभेदार यांची. ते सर्वांना “अण्णा ” म्हणून परिचित.

सुमारे ५० वर्षे सलग ते जैतापूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे कार्यवाह होते. “एकचि तारा समोर आणिक पायतळी अंधार’या ध्येयनिष्ठेने त्यांनी ह्या एकाच संस्थेसाठी तन,मन,धनाने आपले आयुष्य वेचले. शाळेखेरीज अन्य विषय कधीही त्यांच्यासमोर नसे. आज शाळेला जे विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे ते या तपश्चर्येचे फलित आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

शताब्दी महोत्सव


जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित न्यू इंग्लिश स्कूल,जैतापूर शाळेची शताब्दी महोत्सवाकडे.शताब्दी महोत्सवी वर्ष २०१९ ते २०२०


  • श्री गणपती

    शाळेच्या आवारामध्ये डेरेदार वटवृक्षाखाली विसावलेली सतत शाळेवर कृपादृष्टी ठेवणारी हीच ती श्री गणेशाची पाषाण मूर्ती.

  • श्री सरस्वती

    विद्या व कलेची देवता म्हणजेच श्री सरस्वती. खास जयपूरहून मागविण्यात आलेली ही सुबक संगमरवरी शिल्पकृती शाळेच्या सभागृहाची शोभा वाढवित आहे.

  • श्री देव वेताळ

    समस्त जैतापूरवासीयांचे श्रद्धास्थान म्हणजेच ग्रामदैवत श्री देव वेताळ. सुमारे ८०० वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराचा नुकताच ११ मे २०१४ रोजी जीर्णोद्धार व कलशारोह्ण समारंभ कोल्हापूरचे शंकराचार्य यांच्या ह्स्ते पार पडला.

  • Follows us on