इवलेसे रोप लावियेले दारी ।
तयाचा वेलू गेला गगनावरी ॥
या संत ज्ञानेश्वरांच्या ओवी प्रमाणे दि.१३ फेब्रुवारी १९१९ रोजी लाविलेले ज्ञानरुपी रोपटयाचे आता महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले
आपणास पाहावयास मिळत आहे. जैतापूर पंचक्रोशीतील अनेक दुर्बल व मागास विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे बाळकडू याच न्यू इंग्लिश स्कूलने पाजल्याने त्यांना आपआपल्या क्षेत्रात
उत्तुंग भरारी मारता आली. आज कित्येक प्रतिथयश डॉक्टर, वकील,अभियंते व उद्योगपती अभिमानाने केवळ न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्कारामुळे आम्ही घडलो असल्याचे अभिमानाने सांगतात.
मित्रांनो, सुवर्ण महोत्सव,हिरक महोत्सव व अमृत महोत्सवा पाठोपाठ शाळा आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
१३ फेब्रुवारी २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० हे वर्ष शाळेच्या इतिहासात आपल्या सर्वाच्या साक्षीने सुवर्णअक्षराने नोंदले जाणार आहे. सर्व माजी विद्यार्थी,
ग्रामस्थ व शिक्षणाप्रेमींना या महासोह्ळ्यात सामिल होण्याचे व संस्थेची संकल्पित उध्दिष्टे साकार होण्यास आपल्यापरीने खारीचा वाटा उचलण्याचे मी आपणास जाहीर आवाहन करीत आहे.
स्नेहांकित
श्री. जगदीश स. आडविरकर
संयुक्त कार्यवाह व सीईओ